दुर्गसंवर्धन मोहिमा
रसाळगड श्रमदान मोहीम,
 
१६ जानेवारी २०२२ रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे (तारखेप्रमाणे) औचित्य साधून किल्ले रसाळगड ,खेड “दुर्गवीर प्रतिष्ठान” मार्फत श्रमदान व स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
 
सदर मोहिमेमध्ये एकूण १६ दुर्गवीर सदस्यांनी सहभाग नोंदवला होता. गडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून गडावरील सदर आणि बुरुजांची स्वच्छता करण्यात आली .