सामानगड – वल्लभगड गुढीपाडवा – २०१8

हा नाद ढोलांचा….
हा नाद ताशांचा….
हा नाद माय मराठी संस्कृतीचा….
हा नाद नव वर्षाच्या स्वागताचा….
गुढीपाडवा…..

गुढीपाडव्यापासून मराठी सणांची सुरवात होते. आणि गुढीपाडव्यापासूनच मराठी नवार्षालाही सुरवात होते. गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इ. गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे.

दुर्गवीर प्रतिष्ठान गेले अनेक वर्ष वेगवेगळे सण, उत्सव किल्ल्यांवर सात्यत्याने साजरे करत आहे. ह्यावर्षी पण वेगवेगळ्या किल्ल्यांवर गुढीपाडवा साजरा झाला. ह्यावेळी किल्ले वल्लभगड ते सामानगड शोभयात्रा काढण्यात आली. ह्या वेळी प्रथमता वल्लभगडावर गुढी उभारली. तिथून शोभयातत्रेला सुरवात झाली. गडहिंग्लज मध्ये आल्यानंतर ढोल ताशा पथक, लेझीम पथक आणि झांज पथकांनी आपली कला सादर केली. दुर्गवीरच्या शिवकालीन युद्धकला पथकाने लाठी काठी, तलवारबाजी, दानपठ्ठा ह्या खेळाचे सादरीकरण केले. गडहिंग्लजने ह्या वर्षी एक वेगळाच गुढीपाडवा अनुभवला. महाराज्यांच्या मूर्तीला मुजरा करून शोभयात्रा सामानगडाच्या दिशेने निघाली. सामानगडावर गुढी उभारून तिथे लढलेल्या वीरांना अभिवादन करून शोभ यात्रेची सांगता झाली.

www.durgveer.com