
दुर्गवीर म्हटलं कि श्रमदान असा एकाच विचार सर्वांच्या मनात येतो. पण हे श्रमदान म्हणजे काय? कोण करतात हे श्रमदान? जे श्रमदान करतात त्यांना मोबदला काय मिळतो? श्रमदानाशिवाय इतर काही कामे करतात कि नाही हे दुर्गवीर / दुर्गवीरांगणा? कधी करतात हे श्रमदान? यासाठी लागणा-या आर्थिक बाबींचा ताळमेळ कसा बसविला जातो?
हे आणि असे अनेक प्रश्न उभे राहतात याची उत्तर हवी असतील दुर्गवीर प्रतिष्ठान म्हणजे काय हे समजून घ्या!!!
दुर्गवीर प्रतिष्ठान म्हणजे हि म्हटली तर संस्था म्हटलं तर कुटुंब ! इथे येणारा प्रत्येकजण शिवरायांवरील प्रेमाखातर येत असतो. त्याच्या मनात कुठेतरी विचार असतो शिवरायांनी निर्माण केलेल्या वाढविलेल्या या स्वराज्याचे योग्य संगोपन आपण करायचे.
दुर्गवीर हा परिवार सध्या खूप मोठा झालाय. संस्थापक श्री. संतोष गुंडू हासुरकर यांनी काही मोजक्या मावळ्यांना घेऊन उभारलेल्या ह्या संस्थेच वटवृक्ष झाले आहे. गरज आहे ती रोज हा वृक्ष जोपासायची. दुर्गवीर सर्व वीर/ वीरांगना ह्या काम, घर सांभाळून ह्या शिवकार्यात हातभार लावतात. प्रत्येक दुर्गवीर आतुरतेने शनिवार ची वाट पाहत असतो. कधी शनिवार येतो आम्ही मोहिमेला जातो.
श्री. संतोष गुंडू हासुरकर
संस्थापक